Demat Account मध्ये नॉमिनी कशी बदलायची?

डीमॅट खात्यांसाठी नॉमिनी असणं आवश्यक आहे.

जर तुम्ही शेअर बाजारात किंवा म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करत असाल, तर तुमच्याकडे डिमॅट खातं असेलच.

जर तुम्ही तुमच्या डिमॅट खात्यात नवीन नॉमिनी जोडण्याचा किंवा तुमचा नॉमिनी बदलण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. 

ब्रोकरच्या अॅपद्वारे तुमच्या डिमॅट खात्यातील नॉमिनी बदलणं खूप सोपं आहे. हे करण्यासाठी, अॅप किंवा वेबसाइटवर जा आणि तुमच्या प्रोफाइलमधील अकाउंट सेटिंग्ज उघडा. 

येथे, तुम्हाला नॉमिनेशन पर्याय दिसेल. नॉमिनेशन पर्यायावर क्लिक करा आणि नवीन नॉमिनीची माहिती एन्टर करा. आधार ओटीपीद्वारे पडताळणी करा, त्यानंतर तुमची विनंती १ ते ३ दिवसांत मंजूर केली जाईल.

 नॉमिनी बदलण्यासाठी तुम्ही NSDL पोर्टल देखील वापरू शकता. प्रथम, NSDL पोर्टलवर जा आणि लॉग इन करा.

I wish to Nominate या पर्यायावर क्लिक करा आणि नवीन नॉमिनीची माहिती एन्टर करा. आता, आधार ई-साइन प्रक्रिया पूर्ण करा, त्यानंतर तुमची विनंती मंजूर केली जाईल.

Post Office मध्ये ६० महिन्यांसाठी २ लाख रुपये जमा केले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल?

Click Here