घरबसल्या पासपोर्ट कसा काढायचा? पाहा सोपी प्रक्रिया

तुम्हाला पासपोर्ट बनवायचा असेल, तर आता तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने पासपोर्टसाठी अर्ज करू शकता. यासाठीची प्रक्रिया अतिशय सोपी आहे.

सर्वात आधी पासपोर्ट सेवाच्या अधिकृत वेबसाइटवर (https://www.passportindia.gov.in/) जा. येथे तुम्हाला New User Registration वर क्लिक करावं लागेल.

रजिस्ट्रेशन फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती जसे की तुमचे नाव, जन्मतारीख आणि ई-मेल आयडी भरा. त्यानंतर तुमचा आयडी आणि पासवर्ड तयार करा.

रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर, तुमच्या रजिस्टर्ड आयडीनं लॉग इन करा. त्यानंतर 'Apply for Fresh Passport/Re-issue of Passport' या पर्यायावर क्लिक करा.

तुमच्यासमोर एक अर्ज उघडेल. त्यामध्ये तुमची वैयक्तिक माहिती, पत्ता आणि इतर आवश्यक तपशील अचूकपणे भरा. माहिती भरल्यानंतर 'Submit' बटणावर क्लिक करा.

अर्ज सबमिट केल्यानंतर, 'View Saved/Submitted Applications' वर जाऊन 'Pay and Schedule Appointment' निवडा. तुम्हाला तुमच्या जवळच्या पासपोर्ट सेवा केंद्राची वेळ निवडावी लागेल.

पासपोर्टसाठी लागणारे विहित शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरा. तुम्ही नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डचा वापर करू शकता. पेमेंट यशस्वी झाल्यानंतर पावतीची प्रिंट काढून घ्या.

ठरलेल्या तारखेला आणि वेळी सर्व मूळ कागदपत्रांसह पासपोर्ट सेवा केंद्रावर जा. तिथे तुमची बायोमेट्रिक्स आणि कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.

सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमची पोलीस व्हेरिफिकेशन होईल. त्यानंतर काही दिवसांत तुमचा पासपोर्ट पोस्टाद्वारे तुमच्या घरी पोहोचेल.

पोस्टाची ही स्कीम करेल मालामाल; २ लाख जमा केल्यास मिळेल ९० हजारांचं व्याज

Click Here