अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के टॅरिफ लावण्याची निर्णय घेतला आहे. यामागील एक महत्त्वाचे कारण आहे, भारत रशियाकडून करत असलेली तेल खरेदी!
रशियाकडून तेल विकत घेऊन नका, असं ट्रम्प गेल्या काही महिन्यांपासून म्हणत आहेत. पण, भारत रशियाकडून किती तेल विकत घेतो, तुम्हाला माहितीये का?
भारतीय व्यापार माहितीनुसार, २०२४-२५ मध्ये भारताने रशियातून ८७.४ मिलियन टन तेल आयात केले.
भारत वेगवेगळ्या देशाकडून तेल खरेदी करतो. एकूण आयात तेलापैकी ३६ टक्के तेल भारताने रशियाकडून खरेदी केलं.
जूनमध्ये रशियाकडून तेल आयात मोठ्या प्रमाणात करण्यात आली. मागील ११ महिन्यांच्या तुलनेत भारताने जून २०२४ मध्ये ४३.२ टक्के तेल रशियाकडून खरेदी केलं.
भारत इराक, सौदी अरेबिया आणि संयुक्त राष्ट्र अमिराती यांच्याकडून तेल खरेदी करतो. जुलै २०२४ मध्ये भारताने २.०८ मिलियन बॅरल्स प्रति दिवस इतकी रशियातून तेलाची आयात केली.
ही तेल आयात प्रत्येक महिन्यांच्या तुलनेत १२.२ टक्के जास्त होती. ग्लोबल रिअल टाईम डेटा आणि अॅनालिटिक्स पुरवणाऱ्या कल्परची ही माहिती आहे.
एकूण तेल आयातीपैकी भारत ३५-३६ टक्के ते रशियाकडून आयात करतो. तो पैसा रशिया युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी वापर असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांचे म्हणणे आहे.