श्री रामनवमीला सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण

सोन्याच्या दरात २ हजारांपेक्षा, तर चांदीच्या दरात ९ हजारांपेक्षा अधिक घसरण झाली.

श्री रामनवमीच्या मुहूर्तावर सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. 

राजस्थानच्या ताफ्यातील जोफ्रा आर्चरनं २०२५ च्या हंगामात सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध एकही विकेट न घेता ४ षटकात ७६ धावा खर्च केल्या.

आयबीजेएनं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आज २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,४३,७१५ रुपयांपर्यंत खाली आला आहे.

काल संध्याकाळी २४ कॅरेट सोन्याचा दर १,४६,२०५ रुपये प्रति १० ग्रॅम इतका होता, म्हणजेच कालच्या तुलनेत सोन्याच्या किमतीत आज २,४९० रुपयांची घट झाली.

आज शुक्रवारी २३ कॅरेट सोन्याचा दर १,४३,१४० रुपये प्रति १० ग्रॅमच्या पातळीवर आहे. तसेच २२ कॅरेट सोन्याचा दर १,३१,६४३ रुपयांपर्यंत खाली आला आहे.

याशिवाय १८ कॅरेट सोन्याचा दर १,०७,७८६ रुपये आणि १४ कॅरेट सोन्याचा दर ८४,०७३ रुपये प्रति १० ग्रॅम इतका झालाय.

काल संध्याकाळी चांदीचा भाव २,३४,८१४ रुपये प्रति किलो या पातळीवर होता, तो आता ९,११४ रुपयांनी घसरुन २,२५,७०० रुपये प्रति किलोवर आलाय.

Click Here