सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा लेटेस्ट दर

आज २४ कॅरेट सोन्याचा भाव अवघ्या १६ रुपयांनी वधारून १,५१,४९५ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे. दुसरीकडे, चांदीच्या दरात प्रति किलो २७८ रुपयांची वाढ झाली. आता चांदी २,४४,१०३ रुपयांवर पोहोचली.

आयबीजेएच्या दरानुसार, सोने आता सर्राफा बाजारातील त्याच्या १,७६,१२१ रुपयांच्या 'ऑल टाइम हाय' पेक्षा २४,६२४ रुपयांनी स्वस्त आहे.

तर चांदीच्या दरात 'ऑल टाइम हाय' पेक्षा १,४१,८३० रुपयांची घसरण नोंदवण्यात आली आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर विचार केल्यास, आतापर्यंत सोने ७,६०२ रुपयांनी आणि चांदी २३,७९७ रुपयांनी स्वस्त झाली.

आज १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा भाव १४ रुपयांनी वाढून १,३८,७६९ रुपयांवर पोहोचला आहे. यामध्ये ३ टक्के जीएसटी (GST) समाविष्ट नाही; जीएसटीसह हा दर १,४२,९३२ रुपये इतका असेल. 

१८ कॅरेट सोन्याचा दरही आज १२ रुपयांनी वाढून जीएसटीशिवाय १,१३,६२१ रुपये झाला आहे. जीएसटीसह याचा भाव १,१७,०२९ रुपये इतका होईल.

सराफा बाजारात आज २३ कॅरेट सोन्याची किंमत १६ रुपयांनी वाढून १,५०,८८८ रुपयांवर पोहोचली आहे. तर, १४ कॅरेट सोन्याची किंमत १० रुपयांनी कमी होऊन ८८,६२५ रुपये प्रति १० ग्रॅम झाली आहे.

तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित 

Click Here