१० दिवसांत चांदी ३०,३५०, तर ७ दिवसांत सोनं ८,४५५ नं स्वस्त

सोन्या-चांदीच्या दरात सुरू झालेली घसरण अद्यापही कायम आहे.

आज, २४ ऑक्टोबर रोजी, चांदीच्या दरात ३७०० रुपयांची घसरण झाली आहे. तर, सोन्याच्या दरात ९३५ रुपयांची घट झाली आहे. 

सध्या, सोन्याचा भाव १७ ऑक्टोबरच्या सर्वोच्च पातळीपेक्षा ८४५५ रुपयांनी स्वस्त झाला आहे. तर, चांदीचा भाव १४ ऑक्टोबरच्या सर्वोच्च पातळीपेक्षा ३०३५० रुपयांनी खाली आला आहे. 

२४ कॅरेट सोन्याचा दर आता जीएसटीसह १२६०९१ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. तर, चांदी जीएसटीसह १५२१८२ रुपये प्रति किलोवर आली.

आज २३ कॅरेट सोन्याचा दरही ९३४ रुपयांनी स्वस्त होऊन १२१९२६ रुपये प्रति १० ग्रॅम भावाने उघडला. जीएसटीसह त्याची किंमत आता १२५५८३ रुपये झाली आहे. यामध्ये मेकिंग चार्जेस जोडलेले नाहीत.

२२ कॅरेट सोन्याची किंमत ८५६ रुपयांनी तुटून ११२१३६ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचली आहे. जीएसटीसह ती ११५५०० रुपये झाली.

१८ कॅरेट सोनं ७०२ रुपयांच्या घसरणीसह ९१८१४ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचले आहे आणि जीएसटीसह त्याची किंमत ९४५६८ रुपये प्रति १० ग्रॅम झाली.

या घसरणीनंतरही, यावर्षी सोन्याचा भाव ४६६७९ रुपये प्रति १० ग्रॅमनं महाग झाला आहे. तर, चांदी ६१७३३ रुपये प्रति किलोने वाढली आहे.

पैसे दुप्पट करणारी जबरदस्त स्कीम; सरकारची मिळते गॅरेंटी, 'इतक्या' महिन्यांत डबल होईल रक्कम

Click Here