एका झटक्यात सोनं २२०० नं महागलं, चांदीच्या दरातही ६६०० नं वाढ

इतक्या मोठ्या तेजीचं कारण काय?

धनत्रयोदशी-दिवाळीपूर्वी १३ ऑक्टोबरला सोन्याच्या दरात एकाच झटक्यात २२४४ रुपयांची वाढ झाली आहे. तर, चांदीचे दर एका झटक्यात ६६२५ रुपयांनी वधारले आहेत. 

२४ कॅरेट सोन्याचा भाव आता जीएसटीसह १,२७,४८२ रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदी जीएसटीसह १,७६,२५८ रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे.

आज २३ कॅरेट सोने देखील २२३५ रुपयांनी महाग होऊन १,२३,२७३ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडले. जीएसटीसह त्याची किंमत आता १,२६,९७१ रुपये झाली आहे. 

२२ कॅरेट सोन्याची किंमत २०५५ रुपयांनी वाढून १,१३,३७२ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचली आहे. जीएसटीसह ही किंमत १,१६,७७३ रुपये आहे.

तर १८ कॅरेट सोनं १६८३ रुपयांच्या वाढीसह ९२,८२७ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचलं आहे आणि जीएसटीसह याची किंमत ९५,६११ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचली आहे.

१४ कॅरेट सोने देखील १३१३ रुपयांनी महाग होऊन आज ७२,४०५ रुपयांवर उघडले आणि आता जीएसटीसह ७४,५७७ रुपयांवर आले आहे.

कारणं काय? अमेरिकेतील सरकारी शटडाउन आणि फ्रान्समधील राजकीय संकटामुळे जगाच्या वित्तीय बाजारात अस्थिरता वाढली.

यूएस फेडरल रिझर्व्हद्वारे व्याजदरात सातत्याने कपात आणि डॉलर कमकुवत झाल्यामुळे गुंतवणूकदारांनी सोन्यामध्ये रस दाखवला. केंद्रीय बँकांनी मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केल्यामुळे देखील किंमती वाढल्या.

भारताची सोन्याची मागणी प्रामुख्याने आयातीवर अवलंबून आहे. यावर्षी रुपया ३.८% नं कमकुवत झाला आहे, ज्यामुळे रुपयामध्ये सोनं आणखी महाग झालं आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने आपला सोन्याचा साठा ८.१% (२०२३) वरून वाढवून १४% (सप्टेंबर २०२५) पर्यंत केला आहे, जो देशाचा विश्वास दर्शवतो.

१००% पैसे होणार डबल! पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये ₹२५,००० ची गुंतवणूक देईल लाखोंचा रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन

Click Here

राजस्थानच्या ताफ्यातील जोफ्रा आर्चरनं २०२५ च्या हंगामात सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध एकही विकेट न घेता ४ षटकात ७६ धावा खर्च केल्या.