सर्व रेकॉर्ड तोडले, सोन्याचे दर विक्रमी पातळीवर; चांदीही १.५० लाखांच्या जवळ
सोने आणि चांदीच्या दरांची गगनभरारी थांबण्याचं नाव घेत नाहीये. दोन्ही मौल्यवान धातूंनी विक्रमी कामगिरी कायम ठेवली आहे.
सणासुदीच्या काळात सोन्याच्या दरात आज एकाच दिवसात ₹१,४४९ रुपयांची मोठी वाढ झाली आहे, ज्यामुळे सोन्याचा भाव आजवरच्या उच्चांकावर पोहोचलाय. चांदीच्या दरातही ₹६७३ रुपयांची वाढ झालीये.
आयबीजेएनुसार, आजजीएसटीशिवाय२४ कॅरेट सोन्याचा भाव ₹१,१६,९०३ प्रति १० ग्रॅमवर उघडला. जीएसटीसह २४ कॅरेट सोन्याची किंमत आता ₹१,१२,०,४१० प्रति १० ग्रॅम झाली आहे.
दुसरीकडे, चांदीचा भाव जीएसटीशिवाय₹१,४५,०६० प्रति किलो दराने उघडला. तर जीएसटीसह चांदीचा दर आता ₹१,४९,४११ प्रति किलोवर पोहोचलाय.
आज २३ कॅरेट सोन्याचा दर ₹१,४४३ रुपयांनी महाग होऊन ₹१,१६,४३५ प्रति १० ग्रॅम भावाने उघडला आहे. जीएसटीसह याची किंमत ₹१,१९,९२८ झाली आहे (मेकिंगचार्जशिवाय).
२२ कॅरेट सोन्याचा दर ₹१,३२७ रुपयांनी वाढून ₹१,०७,०८३ प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे, तर जीएसटीसह हा दर ₹१,१०,२९५ आहे.
त्याचप्रमाणे, १८ कॅरेट सोन्याचा भाव ₹१,०८६ रुपयांच्या वाढीसह ₹८७,६७७ प्रति १० ग्रॅमवर उघडला आणि जीएसटीसह त्याची किंमत ₹९०,३०७ प्रति १० ग्रॅम झाली आहे.
१४ कॅरेट सोन्याच्या दरात ₹८४७ रुपयांची वाढ होऊन तो ₹६८,३८८ वर उघडला असून जीएसटीसह त्याची किंमत ₹७०,४३९ पर्यंत पोहोचली आहे.
Aadhaar Card मध्ये बदल करायचाय तर आताच करुन घ्या, १ ॲाक्टोबरपासून वाढणार शुल्क, पाहा काय काय बदलणार?