सोनं-चादीसुस्साट... रोज होताहेत किंमतीचे नवे विक्रम, आजही मोठी तेजी
दिवाळीपूर्वी आज सोने-चांदीच्या किंमतींनी सर्व विक्रम मोडीत काढत पुन्हा एकदा नवा उच्चांक गाठला आहे.
ऑक्टोबरच्या अवघ्या ७ व्यावसायिक दिवसांत सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम ७२२१ रुपयांनी वाढले आहेत. तर, चांदीच्या किंमतीत प्रति किलो ११६६६ रुपयांची वाढ झाली आहे.
आज ९ ऑक्टोबरला, सोन्याच्या दरात एकाच झटक्यात ४७२ रुपयांची वाढ झाली आहे, तर चांदीच्या भावात १४०० रुपयांची मोठी वाढ नोंदवली गेली आहे.
२४ कॅरेट सोन्याचा भाव आता जीएसटीसह १२६२४७ रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदीचा भाव जीएसटीसह १५८७२३ रुपये प्रति किलो वर पोहोचला आहे.
२३ कॅरेट सोने देखील ४७० रुपयांनी महाग होऊन १२२०७९ रुपये प्रति १० ग्रॅमच्या भावाने उघडले. जीएसटीसह त्याची किंमत आता १२५७४१ रुपये झाली आहे.
२२ कॅरेट सोन्याची किंमत ४३२ रुपयांनी वाढून ११२२७४ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचली आहे. जीएसटीसह ती ११५६४२ रुपये आहे.
आज १८ कॅरेट सोने ३५४ रुपयांच्या तेजीसह ९१९२८ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचलं आणि जीएसटीसह ते ९४६८५ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचलं.
१४ कॅरेट सोने देखील २७७ रुपयांनी महाग होऊन आज ७१७०४ रुपयांवर उघडलं आणि आता जीएसटीसह ७३८५५ रुपयांवर पोहोचले आहे.
घरबसल्या महिन्याला ₹९२५० ची कमाई करुन देणारी पोस्टाची स्कीम! पण एक चूक पडेल भारी, बसू शकतो ३० हजारांचा फटका