१० ऑक्टोबर रोजी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली.
आज, १० ऑक्टोबर रोजी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली, तर चांदीनं ऐतिहासिक उच्चांक गाठलाय.
आज एकाच झटक्यात सोनं ₹१७८४ नं स्वस्त झालं आहे, तर चांदीच्या दरात ₹२५९३ ची मोठी वाढ नोंदवली गेली आहे.
जीएसटीसह २४ कॅरेट सोन्याचा भाव आता प्रति १० ग्रॅम ₹१,२४,४७० आणि जीएसटीसह चांदीचा भाव प्रति किलो ₹१,६७,००७ वर पोहोचला.
आज २३ कॅरेट सोने देखील ₹१७७७ नं स्वस्त होऊन प्रति १० ग्रॅम ₹१,२०,३६१ च्या दरानं उघडलं. जीएसटीसह याची किंमत आता ₹१,२३,९७१ झाली आहे.
२२ कॅरेट सोन्याची किंमत ₹१६३४ ने कमी होऊन प्रति १० ग्रॅम ₹१,१२,२७४ वर आली आहे. जीएसटीसह ही किंमत ₹१,१४,०१४ आहे.
आज १८ कॅरेट सोने ₹१३३८ च्या घसरणीसह प्रति १० ग्रॅम ₹९०,६३४ वर आले आहे आणि जीएसटीसह याची किंमत प्रति १० ग्रॅम ₹९३,३५३ वर पोहोचली आहे.
१४ कॅरेट सोने देखील ₹१०४४ ने स्वस्त होऊन आज ₹७०,६९४ वर उघडले आणि आता जीएसटीसह ते ₹७२,८१४ वर आले आहे.
₹१३०० ची गुंतवणूक आणि आयुष्यभर मिळेल पेन्शन? जबरदस्त आहे LIC हा प्लान, आयुष्यभर राहाल टेन्शन फ्री