आयटीआर फायलिंगची अंतिम तारीख १५ सप्टेंबर ही निश्चित करण्यात आलीये. त्यापूर्वी हे काम करणं आवश्यक आहे.
आयकरदात्यांना आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी इन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर) भरण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर निश्चित करण्यात आलेली आहे.
यामुळे अजूनही आयटीआर रिटर्न फाइल न केलेल्यांनी तो लवकरात लवकर भरणं गरजेचं आहे.
आयकर भरणा करणं आवश्यक असलेल्या आयकरदात्यांनी वरील तारखेपर्यंत आयटीआर फायलिंग न केल्यास त्यांना मोठा दंड आणि आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
दंडाची तरतूद : पाच लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांसाठी १,००० रु., तर त्यापेक्षा जास्त उत्पन्न असल्यास ५,००० रु. दंड लागू होईल.
अतिरिक्त व्याज : दिलेल्या तारखेला आयटीआर फायलिंग न भरल्यास प्रत्येक महिन्याला १ टक्क्याप्रमाणे अतिरिक्त व्याज आकारलं जाईल.
मोठं नुकसान : काही कर सवलती तसंच मागील १० वर्षातील तोटा पुढील वर्षात भरून काढण्याचा हक्क आयकरदात्याला गमवावा लागेल.
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील