FASTag Annual Pass घेणं अनिवार्य की मर्जीनुसार निवड करू शकता?
१५ ऑगस्टपासूनFASTagवार्षिक पास सुरू होणार आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय १५ ऑगस्टपासूनFASTagवार्षिक पास सुरू करत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जूनमध्येFASTagवार्षिक पास जारी करण्याची घोषणा केली होती.
या FASTag वार्षिक पासची किंमत ३००० रुपये असेल. हा पास १ वर्षासाठी वैध असेल आणि एका वर्षात जास्तीत जास्त २०० टोल प्लाझा ओलांडता येतील.
आता १५ ऑगस्ट जवळ आला आहे, त्यामुळे अनेक वाहन चालकांना प्रश्न पडत आहे की वार्षिक पास घेणे अनिवार्य आहे की ते निवडीवर अवलंबून असेल.
वार्षिक फास्टॅग पास अनिवार्य नाही. सध्याच्या FASTag मध्ये कोणताही बदल होणार नाही आणि ती प्रणाली तशीच सुरू राहील.
ज्या वाहनचालकांना वार्षिक पास घ्यायचा नाही ते टोलप्लाझावर लागू असलेल्या दरांनुसार पैसे देऊन त्यांचा FASTagवापरणं सुरू ठेवू शकतात.
FASTagवार्षिक पास फक्त राष्ट्रीय महामार्ग (NH) आणि राष्ट्रीय द्रुतगती मार्ग (NE) टोलप्लाझावर वैध आहे.
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End