तुम्ही ईपीएफ खात्यातून पैसे काढून शॉपिंग, परदेश दौऱ्यावर खर्च करत असाल तर सावधगिरी बाळगा. या रकमेचा गैरवापर महागात पडू शकतो, असे ईपीएफओने म्हटले.
चुकीच्या कारणांमुळे पैसे काढल्यास, ईपीएफओ रक्कम परत घेऊ शकते आणि दंड देखील लावू शकतो. तसेच, ते नोटीस पाठवून रक्कम वसूलही करू शकतात.
जर एखाद्या सदस्याने घर, फ्लॅट किंवा जमीन खरेदी करण्यासाठी पैसे काढून घेत ते पैसे दुसऱ्या कारणासाठी वापरले, तर ईपीएफओला व्याजासह रक्कम वसुलीचा अधिकार आहे.
पीएफमधून पैसे फक्त लग्न, शिक्षण, आजारपण, घरबांधणी यासाठी वापरता येतात.
नवीन प्रणाली कशी आहे? : नवीचे सीईओ राजीव नरेश म्हणाले की, नव्या व्हर्जनमध्ये ग्राहकांना क्यूआर कोड स्कॅन करताना पेमेंटईएमआयमध्ये रूपांतरित करण्याची परवानगी देण्यात येणार आहे.
लवकरच, देशभरात २० लाखांहून अधिक बिझनेस करस्पॉन्डंट (बीसी) आउटलेटवरूनयूपीआयद्वारे रोख रक्कम काढता येईल. यासाठी एनसीपीआयनेआरबीआयकडूनमंजुरीमागितली आहे. त्याचा मोठा फायदा होईल.