रोज केवळ ₹५० वाचवूनमिळवा₹३५ लाख; पोस्टाच्या या स्कीममध्ये मिळेल गॅरंटीडरिटर्न
या योजनेचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे दररोज फक्त ₹५० गुंतवून मोठी रक्कम जमा करु शकता.
जर तुम्ही कोणत्याही जोखीमशिवाय सुरक्षित गुंतवणूकीच्या शोधात असाल, तर पोस्ट ऑफिसची ग्राम सुरक्षा योजना तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय असू शकते.
ही योजना विशेषतः अशा लोकांसाठी तयार केली आहे ज्यांचं कमी उत्पन्न असूनही दीर्घ कालावधीत मोठा निधी निर्माण करायचा आहे.
या योजनेचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे दररोज फक्त ₹५०, म्हणजेच ₹ १५००प्रति महिना गुंतवणूक करून, मॅच्युरिटीवर₹ ३५लाखांपर्यंतचा निधी मिळू शकतो.
ही योजना पोस्टाच्या ग्रामीण पोस्टल लाइफ इन्शुरन्स (RPLI) अंतर्गत चालते, जी विशेषतः ग्रामीण आणि निम-शहरी भागातील लोकांना लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे.
यामध्ये, तुम्हाला किमान ₹ १०,००० आणि जास्तीत जास्त ₹ १० लाखांचं विमा संरक्षण मिळू शकतं. १९ ते ५५ वर्षे वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक या योजनेत गुंतवणूक करू शकतो.
यात प्रीमियम भरण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. तुम्ही मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक आधारावर प्रीमियम भरू शकता. याशिवाय चार वर्षांनंतर लोनही घेऊ शकता.
जर एखाद्या व्यक्तीनं १९ व्या वर्षी यात गुंतवणूक सुरू केली आणि दरमहा ₹१५००प्रीमियम भरला, तर मॅच्युरिटीवर सुमारे ₹३१ लाख ते ₹३५ लाख परतावा मिळू शकतो.
रकमेतील हा फरक पॉलिसी कालावधी, निश्चित रक्कम, गुंतवणूकदाराचे वय आणि बोनस दर यावर अवलंबून असतो.
भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी