दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारात खरेदीला वेग आला आहे. कंपन्यांच्या मोठ्या सेल्समुळे ऑनलाइन खरेदीही जोरात आहे.
मात्र, या उत्साहासोबत फसवणूकही वाढली आहे. अशी फसवणूक कशी टाळावी, याबाबत आज जाणून घेऊया.
सणासुदीत भामटे लोकप्रिय प्लॅटफॉर्मसारख्या बनावट ई-कॉमर्स साइट्स तयार करून मोबाइल, सोन्याची नाणी, दागिने यांवर अवास्तव सवलती दाखवतात आणि ग्राहकांना जाळ्यात ओढतात.
प्रवासाशी संबंधित फसवणुकीचे प्रकारही वाढले आहेत. केवायसी फसवणूक, एसआयएम-स्वॅप किंवा ई-सिम हॅकिंगद्वारे ओटीपी हॅक करून खात्यांवर हल्ले होतात.
हे सल्ले विसरू नका - अवास्तव सवलती व घाई करायला लावणारे काउंटडाउन यांना धोक्याचा इशारा समजा. लिंक नीट तपासून स्पेलिंग, डोमेन पाहून घ्या.
आधार, पॅन, सीव्हीव्ही, ओटीपी अशी माहिती देऊ नका. सोशल लिंकवर क्लिक करण्याऐवजी वेबसाइटचा पत्ता स्वतः टाइप करा.
क्रेडिट कार्ड किंवा प्रोटेक्टेड वॉलेटद्वारेच पेमेंट करा. अधिक किमतीच्या वस्तू अज्ञात विक्रेत्याकडून घेण्याचे टाळा.
रेल्वे तिकीट बुकिंगपासून ते UPI पेमेंट पर्यंत, आजपासून झाले 'हे' महत्त्वाचे ८ बदल