ट्रम्प यांचा टॅरिफ बॉम्ब, आता फार्मा क्षेत्रात गुंतवणूक करताना काय काळजी घ्याल?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रँडेड आणि पेटंट असलेल्या औषधांवर तब्बल १०० टक्के आयात शुल्क लावले आहे.

अमेरिका हा भारताचा सर्वांत मोठा औषध निर्यात बाजार असल्याने या निर्णयाचा थेट परिणाम भारतीय कंपन्या आणि गुंतवणूकदारांवर होणार आहे.

सर्वप्रथम फार्मा शेअर्समध्ये घाईने गुंतवणूक टाळा. अमेरिकेला जास्त निर्यात करणाऱ्या कंपन्यांच्या शेअरच्या किमतींमध्ये मोठे चढउतार होऊ शकतात. 

गुंतवणूक करण्यापूर्वी कंपनीचा महसूल किती टक्के अमेरिकेवर अवलंबून आहे हे तपासा. दुसरे म्हणजे, गुंतवणूक विविध क्षेत्रांत विभागून घ्या

तिसरे म्हणजे, देशांतर्गत मागणीकडे लक्ष द्या. काही कंपन्यांना स्थानिक बाजारपेठेत मजबूत उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. त्या कंपन्या शोधा. 

शेअर किमतीतील घसरण पाहून शेअर्स विकण्याची घाई करू नका. कंपनीचा अमेरिकेवरील महसूल तपासा. गुंतवणूक विभागा. याशिवाय देशांतर्गत मागणीचा अभ्यास करा. दीर्घकालीन उद्दिष्ट ठेवून संयमानं गुंतवणूक करा.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीची माहिती देण्यात आलेली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन

Click Here