कच्चं तेल हे फक्त निमित्त, संपूर्ण खेळ 'डॉलर'चा आहे

अमेरिकन डॉलरनंच डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवली आहे. नक्की काय आहे हे प्रकरण जाणून घेण्याचा प्रयत्न करू.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर रशियन कच्च्या तेलाचं कारण देत २५ टक्के अतिरिक्त कर लादला आहे, ज्यानंतर एकूण शुल्क ५० टक्के झालंय. 

भारतानं याला अन्याय करणारा आणि अयोग्य निर्णय म्हटलंय. तसंच भारत आपल्या हितांचे रक्षण करण्यासाठी योग्य पावलं उचलेल असंही म्हटलंय. 

केवळ भारतच नाही तर ब्राझील, रशिया, चीनसारखे देश देखील ट्रम्प यांच्या निशाण्यावर आहेत आणि ते सतत त्या सर्वांना धमकावत आहेत. परंतु कोणीही टॅरिफच्या धमक्यांसमोर झुकण्यास तयार नाही. 

खरं तर, कच्चं तेल हा फक्त एक मुद्दा आहे, खरा खेळ अमेरिकन डॉलरचा आहे, ज्यानं अमेरिकेची झोप उडवली आहे. त्यांना ब्रिक्स देशच खटकत आहेत.

ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका व्यतिरिक्त, त्यात इराण, इजिप्त, इथिओपिया, इंडोनेशिया आणि संयुक्त अरब अमिराती यांचाही यात समावेश आहे. 

हे सर्व देश डॉलरवरील त्यांचे अवलंबित्व कमी करण्याच्या बाजूनं आहेत आणि रशिया आणि चीन आपापसात त्यांच्या चलनांमध्ये व्यापार करत आहेत आणि ट्रम्प यांना याचीच सर्वात जास्त भीती वाटतेय.

अमेरिकन डॉलर हे जगभरातील देशांमध्ये वापरले जाणारे राखीव चलन आहे आणि गेल्या आठ दशकांपासून म्हणजेच १९४४ पासून अमेरिकन डॉलरचं वर्चस्व आहे. 

जगभरातील मध्यवर्ती बँका त्यांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी डॉलरचा साठा ठेवतात. अहवालांनुसार, सुमारे ९०% परकीय चलन व्यवहार केवळ डॉलरमध्येच केले जातात. 

परंतु ब्रिक्स देशांनी त्यावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी उचललेली पावले जागतिक राखीव चलनाचा दर्जा हिसकावून घेऊ शकतात. 

ब्रिक्स जागतिक जीडीपीमध्ये ३५% पेक्षा जास्त योगदान देते, जर त्यात समाविष्ट असलेल्या देशांनी जागतिक व्यापारात डॉलरचा वापर कमी केला तर ते अमेरिकेसाठी संकटाचं कारण बनेल.

'डॉलरचा राखीव चलनाचा दर्जा गमावणे हे महायुद्ध गमावण्यासारखे असेल,' असंही ट्रम्प म्हणाले होते. यावरुन त्यांची भीती स्पष्टपणे दिसून येते.

लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी

Click Here