तुम्हीही अनेकदा डी-मार्ट मध्ये गेला असाल. पण १० पैकी ९ जणांना डी मार्टचं खरं नाव काय याचं उत्तर माहीत नसेल, तुम्हाला माहितीये का?
तुम्ही डी मार्ट मध्ये कधी ना कधी गेला असालच. किराणा मालापासून ते घरगुती वस्तूंपर्यंत सर्व काही एकाच ठिकाणी स्वस्त दरात उपलब्ध असतं. त्यामुळेच मध्यमवर्गीय कुटुंबांची ही पहिली पसंती बनलीये.
१९८० च्या दशकात शेअर बाजारात उतरून कोट्यवधींची कमाई करणारे गुंतवणूकदार राधाकिशन दमानी यांनी ग्राहकांच्या गरजा ओळखून २००२ मध्ये डी-मार्टची सुरुवात केली.
डी-मार्टचे मूळ नाव 'दमानीमार्ट' होतं, जे नंतर 'डी-मार्ट' असं लहान करण्यात आलं. डी मार्टमध्ये अनेक ग्राहकांच्या उपयोगाच्या वस्तू स्वस्त दरात मिळतात.
एव्हेन्यूसुपरमार्ट्स लिमिटेड ही डी-मार्टची मूळ कंपनी आहे. आज डी-मार्ट महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि दिल्ली सारख्या राज्यांसह भारतातील ११ राज्यांमध्ये पसरलेला आहे.
डी-मार्ट स्वत:च्या इमारतींमध्ये आपली स्टोअर्स चालवते, ज्यामुळे भाड्याचा खर्च वाचतो आणि तो फायदा थेट ग्राहकांना कमी किमतीच्या स्वरूपात मिळतो.
पैसे बुडणार नाहीत, तर वाढतील; ‘हे’ आहेत गुंतवणूकीचे सुरक्षित पर्याय, गुंतवू शकता तुम्ही पैसा