दिवाळीपूर्वी सोन्याच्या किमतीनं केला नवा विक्रम, चांदीही महागली; खरेदीपूर्वी पाहा नवे दर

जर आता तुम्ही सोनं विकत घेण्याचा विचार करत असत असाल तर तुम्हाला १०० वेळा विचार करावा लागू शकतो. आज, सोने आणि चांदीचे दर पुन्हा एकदा नवीन उच्चांकावर पोहोचलेत. 

आज सोनं ८१८ रुपयांनी महाग झालं आहे, तर चांदी ६०५ रुपयांनी वधारली आहे. जीएसटीसह २४ कॅरेट सोन्याची किंमत आता प्रति १० ग्रॅम १,२३,५६६ रुपये आहे आणि चांदी १,५३,९२१ रुपये प्रति किलो झालीये.

२३ कॅरेट सोन्याच्या किमती ७१६ रुपयांनी वाढली आणि प्रति १० ग्रॅम ११९४८७ रुपयांवर आली. जीएसटीसह त्याची किंमत आता १२३०७१ रुपये आहे. यामध्ये मेकिंग चार्जेस अद्याप समाविष्ट नाहीत.

२२ कॅरेट सोन्याच्या किमतीत ६५८ रुपयांनी वाढ होऊन ती प्रति १० ग्रॅम १०९८९० रुपये झाली आहे. जीएसटीसह ती ११३१८६ रुपये आहे.

आज, १८ कॅरेट सोन्याचा भाव ५३८ रुपयांनी वाढून प्रति १० ग्रॅम ८८,८९९ रुपये झाला आणि जीएसटीसह त्याची किंमत प्रति १० ग्रॅम ९२,२८६ रुपये झाली.

१४ कॅरेट सोन्याचा भावही ४२० रुपयांनी वाढून आज ७०,१८१ रुपये झाला आणि आता जीएसटीसह ७२,२८६ रुपये झाला आहे.

PPF बनेल रिटर्न मशीन, १ रुपयाही खर्च केल्याशिवाय दरवर्षी कमवाल ₹२.८८ लाखांचं व्याज; पाहा कमाईचं सिक्रेट

Click Here