SIP आणि Step-up SIP मध्ये काय फरक? 

कोणती पद्धत तुम्हाला मोठा फंड तयार करून देईल? जाणून घ्या...

SIP म्हणजे काय? दर महिन्याला ठराविक रक्कम म्युच्युअल फंडात गुंतवण्याची पद्धत म्हणजे SIP. दीर्घकाळात कंपाउंडिंगमुळे मोठा फंड तयार होऊ शकतो.

Step-Up SIP कशी वेगळी? या प्रकारात दरवर्षी SIP ची रक्कम वाढवता येते. उत्पन्न वाढल्यास गुंतवणूकही वाढवण्याची सुविधा मिळते.

साध्या SIP पेक्षा अधिक फायदा- सामान्य SIP मध्ये एकच रक्कम कायम राहते, तर Step-Up SIP मध्ये वाढत्या गुंतवणुकीमुळे जास्त परतावा मिळण्याची शक्यता असते.

उदाहरणातून समजून घ्या- दरमहा ₹५,००० SIP सुरू करून पुढील वर्षी ती ₹६,००० केल्यास गुंतवणूक आणि व्याज दोन्ही वेगाने वाढतात.

कोणासाठी फायदेशीर? नोकरी करणारे, तरुण गुंतवणूकदार आणि दीर्घकालीन संपत्ती निर्माण करू इच्छिणाऱ्यांसाठी Step-Up SIP हा प्रभावी पर्याय मानला जातो.

Click Here