सोशल मीडियाने कोणत्या देशांमध्ये सत्ता उलथवली?

तुम्हाला सोशल मीडियामुळे घडलेल्या या घटनांबद्दल माहिती आहे का?

जैस्मिन क्रांती (ट्युनिशिया, २०१०-११) : सोशल मीडियातून सुरू झालेली पहिली मोठी क्रांती. बेरोजगारी, भ्रष्टाचाराला कंटाळलेल्या तरुणांनी चळवळ सुरू केली. राष्ट्राध्यक्ष अबिदिन सत्तेवरून पायउतार झाले.

अरब स्प्रिंग (मध्य पूर्व, २०११): ट्युनिशियामधून पेटलेल्या ठिणगीने लिबिया, येमेन, सीरिया आणि बहरीनमध्ये आग लावली. याला अरब स्प्रिंग असे म्हणतात. इजिप्त, लिबिया आणि येमेनमध्ये सत्तांतर झाले.

व्हॉट्सअॅप चळवळ (लेबनॉन, २०१९) : व्हॉट्सअॅप कॉलवर कर लादण्याच्या योजनेविरुद्ध आंदोलनाचा भडका उडाला.

श्रीलंका चळवळ (२०२२) : आर्थिक संकटाने त्रस्त लोकांनी #गोहोमगोटा या हॅशटॅगसह राष्ट्राध्यक्ष गोटाबाया यांच्याविरुद्ध आंदोलन सुरू केले. देशात सत्ता बदलली.

बांगलादेश चळवळ (२०२४) : आरक्षणा सुधारणांविरुद्ध विद्यार्थ्यांचे आंदोलन पेटले. पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडावा लागला.

इंडोनेशिया चळवळ (२०२५) : खासदारांचे भत्ते वाढवण्याच्या प्रस्तावावर तरुणांचा रोष उफाळून आला.

अनघा भगरेची कोकणातील गणपतीपुळ्याला भटकंती

Click Here