धमाकेदारलिस्टिंग, ३ दिवसांपासून तुफान तेजी; कंडोमबनवणाऱ्याकंपनीनं केलं मालामाल
ब्लॉकबस्टरलिस्टिंगनंतर, कंपनीचे शेअर्स सलग तिसऱ्या दिवशी अपर सर्किटवर पोहोचलेत.
कंडोम उत्पादक कंपनी अनोंदिता मेडिकेअरच्या शेअर्समध्ये मोठी तेजी दिसून येत आहे. ब्लॉकबस्टर लिस्टिंगनंतर, कंपनीचे शेअर्स सलग तिसऱ्या दिवशी ५ टक्क्यांच्या अपर सर्किटवर पोहोचलेत.
बुधवारी अनोंदिता मेडिकेअरचे शेअर्स ५ टक्क्यांच्या अपर सर्किटनंतर ३१८.८५ रुपयांवर पोहोचले. कंपनीच्या शेअर्सनी ५२ आठवड्यांचा नवा उच्चांकही गाठला आहे.
१ सप्टेंबर २०२५ रोजी अनोंदिता मेडिकेअरचे शेअर बाजारात लिस्ट झाले. कंपनीचा आयपीओ २२ ऑगस्ट रोजी गुंतवणूकीसाठी उघडला गेला आणि २६ ऑगस्टपर्यंत खुला राहिला.
शेअर्सची किंमत १४५ रुपये होती. कंपनीचे शेअर्स बाजारात ९०% प्रीमिअमसह २७५.५० रुपयांना लिस्ट झाले. लिस्टिंगच्या दिवशी कंपनीचे शेअर्स ५ टक्क्यांच्या अपर सर्किटसह २८९.२५ रुपयांवर बंद झाले.
लिस्टिंगनंतरदुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशीही कंपनीचे शेअर्स ५ टक्क्यांच्या अपर सर्किटवर आहेत. १४५ रुपयांच्याइश्यू किमतीच्या तुलनेत, अनोंदितामेडिकेअरच्याशेअर्समध्ये १२० टक्के वाढ झाली आहे.
कंपनी पुरुष आणिमहिलांसाठीफ्लेवर्डकंडोमबनवते. कंपनीCOBRA याब्रँडनावानं आपली उत्पादनं विकते. अनोंदितामेडिकेअर दरवर्षी ५६२ दशलक्ष कंडोम तयार करते.
EMI चा एकही हप्ता मिस झाला तर किती कमी होतो CIBIL? पाहा ३०, ६०, ९० दिवसांचा उशिर किती पडेल भारी