GST कमी होणार असला, तरी तुमचं घर घेण्याचं स्वप्न महागणार! कारण काय?

अफोर्डेबल हाऊसिंग सेक्टरसह मिड-सेगमेंट आणखी अडचणीत येण्याची शक्यता; सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार झळ

चीन, अमेरिका आणि युरोपमधून येणाऱ्या बांधकाम साहित्यावर ५०% पर्यंत आयात शुल्क लावल्यास त्याचा थेट परिणाम भारतातील घर घेणाऱ्यांवर होऊ शकतो. 

नारॉकच्या ताज्या अहवालानुसार, असे झाल्यास भारतात घरबांधणीचा खर्च ५% किंवा त्यापेक्षा अधिक वाढू शकतो. कारण, बिल्डर्स वाढलेला खर्च ग्राहकांवर टाकतात. 

परवडणाऱ्या घरांमध्ये ५००-८०० प्रति चौरस फूट वाढ झाल्यास एकूण किंमत ५ लाखांपर्यंत वाढू शकते. मध्यमवर्गीयांसाठी हा मोठा आर्थिक फटका ठरू शकतो.

छोट्या विकासकांनी कमी नफ्यामुळे नव्या प्रकल्पांचे लाँचिंग कमी केले, सुविधा कमी केल्या, तसंच प्रकल्प पुढे ढकलले आहेत. यामुळे आधीच संकटात असलेले ॲफोर्डेबल हाऊसिंग सेक्टर आणखी अडचणीत येऊ शकतो.

सिमेंटवरील जीएसटी २८% वरून १८% केल्यास दिलासा मिळू शकतो. यामुळे स्वस्त घरांच्या किमतीत २४% घट, मध्यम श्रेणीतील घरांच्या किमतीत २३% घट होऊ शकेल. 

पण, लक्झरी घरांना मर्यादित फायदा होईल, कारण आयात फिनिशेसवर वाढीव कर लागू राहील.

२०१९ ते २०२४ दरम्यान घरबांधणी खर्च जवळपास ४०% वाढला. ही वाढ सिमेंट, स्टील, ॲल्युमिनियम, तांबे, मजुरी आणि लॉजिस्टिक्सच्या खर्चामुळे झाली. 

मजुरी खर्चात केवळ २०२४ मध्येच २५% वाढ, तर २०१९ पासून एकूण वाढ १५०% झाली आहे. आता आयात शुल्क वाढले तर हा अतिरिक्त भारही जोडला जाईल. 

Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज

Click Here