पवरून कर्ज घेणं सोपं; पण धोकादायक का आहे?

आजकाल मोबाइल ॲपवरून कर्ज घेण्याचा ट्रेंड जोरात आहे. पण याचा धोकाही तितकाच जास्त आहे.

आजकाल मोबाइल ॲपवरून कर्ज घेण्याचा ट्रेंड जोरात आहे. फक्त स्मार्टफोन आणि इंटरनेट असले की काही तासांत पैसे खात्यात येतात. 

वैद्यकीय खर्च असो वा विजेचे बिल, तातडीच्या गरजांसाठी हे कर्ज अनेकांना उपयोगी पडतं; पण जिथे सोय आहे, तिथे धोकेही आहेत. 

भारतीय रिझर्व्ह बँकेची परवानगी नसलेली अनेक कर्ज ॲप्स बाजारात आहेत. ही ॲप्स जादा व्याज, वेगवेगळे शुल्क आणि जबरदस्तीच्या वसुलीच्या पद्धती वापरतात. 

काही ॲप्स तर कर्जदारांचा डेटा घेऊन छळ आणि ब्लॅकमेल करतात. अशा ॲपमुळे केवळ पैसेच नाही तर तुमच्या प्रतिष्ठेलाही धक्का बसू शकतो.

अनधिकृत ॲप्स मोबाइलमधून फोटो, संपर्क किंवा कागदपत्रे घेऊन ठेवतात. याचाच गैरवापर करून अनेकांना सार्वजनिक अपमानाला सामोरं जावं लागलंय. फक्त अधिकृत व खात्रीशीर ॲपमधूनच कर्ज घेणे शहाणपणाचं ठरते.

कोणते ॲप सुरक्षित? : आरबीआय नोंदणीकृत बँका किंवा नॉन-बँकिंग फायनान्स कंपन्यांची ॲप्स सुरक्षित मानली जातात. कायदेशीर ॲप्स कधीही अकाउंट्सना प्रवेश मागत नाहीत.

पती पत्नीसाठी डबल नफ्याची ट्रिक! टॅक्सही शून्य, व्याजही जास्त; कसा घ्याल फायदा?

Click Here