पत्नीच्या नावावर घर खरेदी केल्यास मिळणारे ५ फायदे

पत्नीच्या नावावर घराची खरेदी केल्यास स्टॅम्प ड्यूटीपासून ते गृहकर्जाच्या व्याजापर्यंत सवलत मिळू शकते. याशिवाय कोणते फायदे आहेत जाणून घेऊ.

पण घर पूर्णपणे पत्नीच्या नावावर घेतलं, तरी तिचा उत्पन्नाचा स्रोत स्पष्ट असावा; अन्यथा बेनामी मालमत्ता कायद्यांतर्गत कारवाई होऊ शकते, हेदेखील लक्षात घेतलं पाहिजे.

काही राज्यांत घराची नोंदणी करताना महिलांना स्टॅम्प ड्यूटी कमी लागते. उदा. दिल्लीत पुरुषांना ६%, तर महिलांना फक्त ४% स्टॅम्प ड्यूटी आहे.

घर पती पत्नी दोघांच्या नावावर संयुक्तपणे असेल व दोघेही गृहकर्जाचे हप्ते भरत असतील, तर दोघांनाही ८०सी अंतर्गत कर सवलत मिळते.

अनेक बँका महिलांना व्याजदरात सवलत देतात. उदा. ०.०५% पर्यंत व्याजदरात सूट मिळू शकते. दीर्घकालीन कर्जासाठी याचा चांगला फायदा होतो.

जर घर भाड्यानं दिलं असेल आणि पत्नीच्या नावावर असेल, तर त्यावर मिळणारं उत्पन्न तिच्या कर स्लॅबनुसार मोजलं जाईल. यामुळे संपूर्ण कुटुंबाच्या करात बचत होऊ शकते.

पत्नीच्या नावावर मालमत्ता असल्यास भविष्यात आर्थिक सुरक्षेचा आधार मिळतो. विशेषतः कौटुंबिक वाद किंवा कायदेशीर बाबतीत हे फायदेशीर ठरते.

पती पत्नीसाठी बेस्ट आहे Post Office ची 'ही' स्कीम; ५ वर्षांत जमवू शकता १३ लाख रुपये, जाणून घ्या

Click Here