आयुष्मान कार्डाद्वारे ५ लाखांचा मोफत उपचार कुठे होणार? 'अशी' शोधा तुमच्या शहरातील हॉस्पिटल्स
भारत सरकारची "आयुष्मान भारत योजना" ही अनेकांसाठी दिलासादायक ठरत आहे. या योजनेअंतर्गत, पात्र लाभार्थ्यांना दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळतात.
या अंतर्गत येणाऱ्या रुग्णालयांची यादी तुम्ही मोबाईलद्वारे पाहू शकता. जाणून घेऊ तुम्ही कसं पाहू शकता याची यादी. पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसिजर.
स्टेप १: सर्वप्रथम तुमच्या मोबाईल किंवा कम्प्युटरच्या ब्राउझरमध्ये आयुष्मान भारत योजनेची अधिकृत वेबसाइट उघडा.
स्टेप २: वेबसाइटच्या होमपेजवर पोहोचल्यानंतर, तुमच्या लॉगिन क्रेडेन्शियल्सचा वापर करून पोर्टलवर सुरक्षितपणे लॉगिन करा.
स्टेप ३: यशस्वीरीत्या लॉगिन झाल्यानंतर, तुम्हाला स्क्रीनवर ‘Find Hospital’ हा एक स्पष्ट पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
स्टेप ४: आता तुमच्यासमोर जे नवीन पेज उघडेल, तिथे तुम्हाला तुमच्या राज्याचे नाव, जिल्ह्याचे नाव आणि तुम्ही कोणत्या प्रकारचे रुग्णालयशोधत आहात, ही माहिती भरावी लागेल.
स्टेप ५: याच पेजवर तुम्हाला ‘Empanelment Type’ हा पर्याय मिळेल. त्यामधून तुम्हाला ‘PMJAY’ निवडायचं आहे.
स्टेप ६: शेवटी, सुरक्षेसाठी दिलेला Captcha कोड संबंधित बॉक्समध्ये भरा आणि Search बटणावर क्लिक करा.
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड