देशातील प्रत्येक मोबाइल युझर आता महिन्याकाठी सरासरी ३१ जीबीपेक्षा जास्त डेटा वापरत असल्याचं समोर आलं आहे. 'नोकिया'च्या १३ व्या 'मोबाइल ब्रॉडबैंड इंडेक्स' अहवालातून ही माहिती समोर आली.
देशातील एकूण डेटा वापर दरमहा २७ एक्साबाइटच्या पुढे गेला असून, ५जी डेटा वापर आणि 'स्थिर वायरलेस प्रवेश' या क्षेत्रात भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
५जी नेटवर्कवरील डेटा वापरामध्ये वर्षभरात तब्बल ७० टक्क्यांची वाढ होऊन तो १२.९ एक्साबाइटवर पोहोचला आहे
घराघरांत केबलशिवाय हाय-स्पीड इंटरनेट पोहोचवणाऱ्या एफडब्ल्यूए तंत्रज्ञानाच्या वापरामध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत दुप्पट वाढ झाली. एकूण ५जी डेटामध्ये या तंत्रज्ञानाचा वाटा २५ टक्क्यांहून अधिक आहे.
महानगरांमध्ये ५जीचा वापर सर्वाधिक असून, एकूण डेटा वापरात त्याचा वाटा ५८ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.
कच्च्या तेलाच्या किमतीत १२ टक्क्यांच्या मोठ्या तेजीमुळे सोन्या-चांदीचे दर आपटले