एका शेअरवर २४ बोनस शेअर्स देणार कंपनी, रिटर्न देण्यातही एक नंबर; ३ महिन्यांत पैसे केले दुप्पट

बोनस शेअर देणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक चांगली बातमी आहे. मल्टीबॅगर स्टॉक Apis India Ltd ने बोनस शेअर देण्याचा निर्णय घेतला आहे. 

कंपनीकडून १ शेअरवर २४ शेअर्स बोनस म्हणून दिले जात आहेत. याची घोषणा कंपनीने १३ ऑक्टोबरला केली. यापूर्वी कंपनीनं २०१० मध्ये बोनस शेअर्स दिले होते. आज कंपनीच्या शेअर्सना अप्पर सर्किट लागलं.

१३ ऑक्टोबर रोजी कंपनीने एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार, १० रुपयांच्या फेस व्हॅल्युच्या एका शेअरवर २४ शेअर्स बोनस म्हणून दिले जातील. 

या बोनस इश्यूसाठी कंपनीने अद्याप रेकॉर्ड डेटची घोषणा केलेली नाही. येणाऱ्या दिवसात कंपनी रेकॉर्ड डेटचीही घोषणा करेल अशी अपेक्षा आहे.

२०१० मध्ये गुंतवणूकदारांना कंपनीनं बोनस शेअर दिले होते. तेव्हा कंपनीकडून पात्र गुंतवणूकदारांना १०० शेअर्सवर ३२३ शेअर्स बोनस म्हणून देण्यात आले होते.

गेल्या एका महिन्यामध्ये कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीमध्ये ५५ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर, केवळ ३ महिन्यांत स्टॉकनं पोझिशनल गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केलेत. 

या दरम्यान, कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत १५२ टक्क्यांची वाढ झाली आहे. एका वर्षात कंपनीच्या शेअर्सचा भाव २२२ टक्के वाढलाय.

मंगळवारी कंपनीच्या शेअर्सचा भाव बीएसईवर ५ टक्क्यांच्या उसळीनंतर ८१९.४० रुपयांच्या स्तरावर पोहोचला. ५ वर्षांत पोझिशनल गुंतवणूकदारांना यानं ४३५३ परतावा दिला.

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

जिंका ₹१००० चे Fastag रिचार्ज एकदम FREE! काय, कुणासाठी आणि कधीपर्यंत आहे ही 'स्कीम'? वाचा...

Click Here