७ दिवसांमध्ये १५५% टक्क्यांची वाढ; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या, आजही अपर सर्किट

एअरफ्लो रेल टेक्नॉलॉजीच्या शेअरमध्ये आज गुरुवारी ५% चा 'अपर सर्किट' लागलं. कंपनीचा शेअर बीएसईवर ३५६.३५ रुपयांवर पोहोचला असून, हा त्याचा ५२ आठवड्यांचा उच्चांक आहे. 

कंपनीच्या शेअर्सची १८ सप्टेंबर रोजी ९०% प्रीमियमवर लिस्टिंग झाली होती, ज्याचा प्राइस बँड १४० निश्चित करण्यात आला होता. 

लिस्टिंगच्या फक्त ७ दिवसांतच एअरफ्लो रेल टेक्नॉलॉजीच्या शेअरने १५५% पर्यंत परतावा दिला आहे.

कंपनीचा आयपीओ (IPO) १५ सप्टेंबर रोजी बोली लावण्याच्या शेवटच्या दिवशी जबरदस्त सबस्क्रिप्शनसह बंद झाला होता. एअरफ्लो रेल टेक्नॉलॉजीचा आयपीओ हा 'बुक-बिल्डिंग इश्यू' होता. 

कंपनीनं आयपीओचा प्राइस बँड प्रति शेअर १३३ ते १४० रुपये निश्चित केला होता. सुमारे ९१.१ कोटी रुपयांच्या या एसएमई इश्यूला ११ ते १५ सप्टेंबर दरम्यान चांगला प्रतिसाद मिळाला. 

एअरफ्लो रेल टेक्नॉलॉजी लिमिटेडची स्थापना डिसेंबर १९९८ मध्ये झाली होती. ही कंपनी भारतीय रेल्वेच्या रोलिंग स्टॉकसाठी (ट्रेनचे डबे आणि संबंधित उपकरणं) कम्पोनंट्स तयार करते.

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

१ ऑक्टोबरपासून बदलणार ७ नियम, सामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम; ऑनलाइन गेमिंगपासून तिकिटापर्यंत आहे यादीत

Click Here