५ भागांमध्ये विभागला जाणार अदानींचा 'हा' शेअर; गुंतवणूकदारांना केलंय मालामाल

अदानी समूहाची वीज कंपनी अदानी पॉवर पहिल्यांदाच स्टॉक स्प्लिट करणार आहे. अदानी पॉवर त्यांचे शेअर्स ५ भागांमध्ये विभागणारे. 

अदानी समूहाची कंपनी १० रुपये फेस व्हॅल्यू असलेल्या शेअर्सनारुपये फेस व्हॅल्यू असलेल्या ५ शेअर्समध्ये विभागणार आहे. 

१९ सप्टेंबर, शुक्रवारी अदानी पॉवरचे शेअर्स ८ टक्क्यांहून अधिक वाढून ६८६.९५ रुपयांवर पोहोचले. गेल्या पाच वर्षांत कंपनीच्या शेअर्समध्ये १७०० टक्क्यांहून अधिक वाढ झालीये.

अदानी पॉवरच्या शेअर स्प्लिटची रेकॉर्ड तारीख सोमवार, २२ सप्टेंबर २०२५ आहे. प्रवर्तकांकडे अदानी पॉवरमध्ये ७४.९६ टक्के हिस्सा आहे, तर सार्वजनिक शेअरहोल्डिंग २५.०४ टक्के आहे.

अदानी समूहाची कंपनी असलेल्या अदानी पॉवरच्या शेअर्समध्ये गेल्या पाच वर्षांत १७१५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. १८ सप्टेंबर २०२० रोजी अदानी पॉवरचे शेअर्स ३७.४० रुपयांवर होते. 

१९ सप्टेंबर २०२५ रोजी कंपनीचे शेअर्स ६८६.९५ रुपयांवर पोहोचले. गेल्या चार वर्षांत अदानी पॉवरचे शेअर्स ५७५ टक्क्यांनी वाढले आहेत. गेल्या दोन वर्षांत कंपनीचे शेअर्स ८० टक्क्यांनी वाढलेत. 

कंपनीच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी ४३२ रुपये आहे. त्याच वेळी, कंपनीच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची उच्चांकी पातळी ६८६.९५ रुपये आहे.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. गुंतवणूकीपूर्वी या क्षेत्रातील तज्ज्ञांचा किंवा जाणकारांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय

Click Here