Aadhaar Update करणं आता महागलं, पाहा किती द्यावं लागणार शुल्क
आधार कार्डअपडेट करणं आता महाग होणार आहे, कारण युनिकआयडेंटिफिकेशनअथॉरिटी ऑफ इंडियानं १ ऑक्टोबर २०२५ पासून शुल्कामध्ये बदल केला आहे.
ज्यासाठी पूर्वी ₹५० आकारले जात होते, ते आता ₹७५ करण्यात आले. तर ज्यासाठी ₹१०० शुल्क लागत होतं, त्यासाठी आता ₹१२५ आणि ज्या सेवांसाठी सध्या ₹७५ शुल्क आहे, ते वाढवून रु. ९० करण्यात आलं आहे.
जर एखाद्या व्यक्तीला नामांकित बायोमेट्रिक्स, जसे की फिंगरप्रिंट, आयरिसआणि फोटोअपडेट करायचे असतील, तर वेगवेगळ्या प्रकारच्या शुल्काचे नियम लागू होतील.
इतर सर्व प्रकरणांमध्ये रु. १२५ शुल्क लागू होईल. मात्र, वेळेवर अपडेट्सला प्रोत्साहन देण्यासाठी, हे शुल्क ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत ७ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांसाठी माफ करण्यात आले आहे.
जर तुम्ही नाव, लिंग, जन्मतारीख, पत्ता, मोबाईल नंबर किंवा ईमेल यांसारखा कोणताही डेमोग्राफिक डेटा अपडेट करत असाल, तर पूर्वीच्या ₹५० ऐवजी आता ₹७५ शुल्क लागू होऊ शकते.
नाव, लिंग, जन्मतारीख, पत्ता तुम्ही मायआधारपोर्टलद्वारे करत असाल, तर ते १४ जून २०२६ पर्यंत विनामूल्य आहे. मात्र, जर हे अपडेट आधार केंद्रावर केलं, तर पूर्वीच्या ₹५० शुल्काऐवजी ₹७५ शुल्क लागू होईल.
आधार होम एनरोलमेंट सुविधेचा लाभ घेण्यासाठी जीएसटीसह₹७०० शुल्क निश्चित करण्यात आले आहे. ही रक्कम डेमोग्राफिकडेटा किंवा बायोमेट्रिकअपडेटसाठी लागू असलेल्या नियमित शुल्काव्यतिरिक्त असेल.
मुलांचं शिक्षण होऊ शकतं फ्री, तरीही वाचू शकतात ५० लाख रुपये; 'हा' प्लान टेन्शनला करेल बाय-बाय