तुम्ही जर शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर तुम्हीही कधी ना कधी 'झीरो टू हिरो' ट्रेडिंग ऐकलं असेलच.
झीरो टू हिरो ट्रेडिंगचा ट्रेंड सध्या वेगाने वाढत आहे.
यात लहान भांडवलावर मोठे जोखीम घेऊन कमी वेळेत मोठा नफा मिळवण्याचे स्वप्न पाहतात.
हे ट्रेड मुख्यतः ऑप्शन्समध्ये, एक्स्पायरीच्या दिवशी घेतले जातात.
पण, यात प्रचंड धोका आहे. एका सेकंदात प्रीमियम 'झीरो' होऊन हजारो रुपये बुडू शकतात.
तज्ञांच्या मते, रिस्क मॅनेजमेंट न केल्यास नुकसान होण्याची शक्यता ९९% असते.
तुमच्याकडे कमी भांडवल असल्यास, 'झीरो टू हिरो' ट्रेडिंगमध्ये कधीही गुंतवणूक करू नका.
ज्यांच्याकडे अतिरिक्त पैसे आहेत आणि नुकसान सोसण्याची क्षमता आहे, त्यांनीच हे करावे.
हे खरे आहे की, कधीकधी यात पैसे दुप्पट किंवा त्याहून अधिक होतात.
भावनेच्या भरात नव्हे, तर अभ्यास करून आणि जोखीम व्यवस्थापन करूनच बाजारात निर्णय घ्या.