सोन्याचं वेड जगभरात!मध्यवर्ती बँका असोत, मोठे गुंतवणूकदार किंवा सामान्य माणूस, प्रत्येकाच्या पोर्टफोलिओमध्ये सोनं असतं.
भारतीयांचं अनोखं प्रेम!जगात भारतीयांइतकं सोन्यावर प्रेम करणारे दुर्मिळच! हे प्रेम केवळ दागिन्यांसाठी नाही, तर आर्थिक सुरक्षिततेसाठीही आहे.
सोन्याची चमक कधीच कमी होत नाही!प्राचीन काळापासून सोनं हे संपत्ती, शक्ती आणि प्रतिष्ठेचं प्रतीक राहिलं आहे, आजही त्याची चमक कायम आहे.
सर्वाधिक सोन्याचा साठा कोणाकडे?पण, जगात सर्वात जास्त सोनं कोणाकडे आहे, हे तुम्हाला माहीत आहे का?
भारतीयांकडे जगातील सर्वाधिक सोनं!फायनान्शियल एक्सप्रेसनुसार, भारतीयांकडे जगातील मध्यवर्ती बँकांच्या एकूण साठ्याइतकं सोनं आहे!
२५,००० टन सोन्याचा विक्रम!भारतीय कुटुंबांकडे सुमारे २५,००० टन सोनं आहे, जे चीन (२०,००० टन), अमेरिका, जर्मनी, जपानपेक्षा खूप जास्त आहे.
केवळ दागिना नाही, सुरक्षितता!भारतात सोनं हे केवळ दागिना नाही, तर आर्थिक सुरक्षितता आणि सामाजिक प्रतिष्ठेचं प्रतीक आहे.
अमेरिकेपेक्षा तिप्पट सोन्याचा साठा!अमेरिकेतील लोकांकडे ८,१३३ टन, जर्मनीकडे ३,३५५ टन, पण भारतीयांकडे २५,००० टन सोनं आहे.
किमती वाढूनही मागणी कायम!सोन्याच्या किमती वाढल्या असल्या तरी भारतीयांची मागणी फारशी कमी झालेली नाही, कारण ते त्यांच्यासाठी सुरक्षित गुंतवणूक आहे.