अमेरिका आणि जर्मनी आघाडीवर; भारताचा कितवा नंबर? जाणून घ्या...
अमेरिका- अमेरिका अनेक दशकांपासून जगातील सर्वात मोठा सोन्याचा साठा असलेला देश आहे. 2025 Q2 पर्यंत त्यांच्याकडे 8,133.46 टन सोने होते.
जर्मनी- जर्मनीकडे सध्या 3,350.25 टन सोने आहे. 2000 मध्ये हे 3,468 टन होते.
इटली- इटलीचे सोन्याचे भंडार अनेक दशकांपासून स्थिर आहे. सध्या त्यांच्याकडे 2,451.84 टन आहे.
फ्रान्स- फ्रान्सकडे 2002 मध्ये 3,000 टनांहून अधिक सोने होते. मात्र, सध्या त्यांच्याकडे 2,437 टन सोने आहे.
रशिया- 2000 मध्ये रशियाकडे फक्त 343 टन सोने होते. आज ते वाढून 2,335 टनांपर्यंत पोहोचले आहे.
चीन- चीनकडे सध्या सुमारे 2,279 टन सोने आहे, त्याचा साठा हळूहळू वाढत आहे.
स्वित्झर्लंड- लहान देश असूनही स्वित्झर्लंडकडे 1,040 टन सोने आहे. यामागे प्रमुख कारण म्हणजे स्विस बँका.
भारत- भारताकडे सध्या 880 टन सोने आहे, जे आतापर्यंतचे सर्वाधिक आहे. त्यामुळे भारत हा जगातील आठवा क्रमांकाचा सोनेधारक देश ठरला आहे.