बचत करणे चांगली सवय, पण पैसा वाढवण्यासाठी काय कराल?
बचत करणे नक्कीच चांगली सवय आहे, पण ते पुरेसे नाही. फक्त घरात किंवा बँकेत पैसे ठेवल्याने महागाईमुळे त्यांची किंमत कमी होते.
तुमचा पैसा वाढवण्यासाठी त्याची म्युच्युअल फंड, पीपीएफ (पब्लिक प्रॉव्हिडंट फंड) किंवा गोल्ड बॉण्ड यांसारख्या पर्यायांमध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे.
अनेक महिला आर्थिक निर्णयांची जबाबदारी पती किंवा इतरावर सोपवतात. दुसऱ्यांचा सल्ला घ्या, पण तुमच्या पैशाबद्दलचे अंतिम निर्णय स्वतःच घ्या. तुमच्या पैशावर तुमचा स्वतःचा ताबा असणे खूप महत्त्वाचे आहे.
माहिती न घेता गुंतवणूक करणे म्हणजे मैत्रिणीने केली म्हणून किंवा जाहिरात पाहिली म्हणून पैसे गुंतवते असा विचार करणे धोकादायक आहे.
त्यामुळे कोणत्याही योजनेत पैसे गुंतवण्याचा निर्णय घेण्यापूर्वी त्या योजनेची संपूर्ण माहिती, त्यात असलेली जोखीम आणि त्याचा कालावधी समजून घ्या.
अनेकदा महिला फक्त कुटुंबातील पुरुषांसाठीच विमा घेतात. पण आरोग्य विमा व जीवन विमा प्रत्येक महिलेसाठीही महत्त्वाचा आहे. यामुळे अचानक येणाऱ्या वैद्यकीय खर्चाचा किंवा इतर आर्थिक भार कमी होतो.