या रेअर अर्थ मेटल्सचा उपयोग कुठे केला जातो? भारतासाठी काम महत्वाचे आहे?
आवर्त सारणीत लँथनाइड सिरीजमधील 15 धातू आणि त्यासोबत स्कँडियम व इट्रियम यांना मिळून “रेअर अर्थ मेटल्स” म्हटले जाते.
हे धातू पृथ्वीच्या पृष्ठभागात तुलनात्मकरीत्या मुबलक असतात, पण वेगळे काढणे कठीण असल्याने त्यांना ‘रेअर’ म्हटले जाते.
रेअर अर्थ मेटल्स कधीही एकटे सापडत नाहीत. ते एकमेकांत मिसळलेले असतात आणि त्यांचे विभाजन महाग व गुंतागुंतीचे असते.
स्मार्टफोन, लॅपटॉप, टेलिव्हिजन, कॅमेरे आणि फायबर ऑप्टिक्समध्ये या धातूंचा वापर होत असल्याने ते आधुनिक जीवनासाठी अत्यावश्यक झाले आहेत.
EV मोटर्स, बॅटरी, मॅग्नेट आणि हाय-परफॉर्मन्स मोटर पार्ट्समध्ये रेअर अर्थ मेटल्सची मोठ्या प्रमाणावर गरज असते.
मिसाइल, जेट इंजिन, रडार, लेझर उपकरणे यांसारख्या संरक्षण तंत्रज्ञानात हे धातू अपरिहार्य आहेत.
जगातील सुमारे 60-70% रेअर अर्थ मेटल्सचे उत्पादन आणि प्रक्रिया करण्यावर चीनचा कंट्रोल आहे.
भारतात ओडिशा, केरळ आदी ठिकाणी हे धातू सापडतात, पण प्रक्रिया तंत्रज्ञानाच्या मर्यादेमुळे उत्पादन कमी आहे.
तंत्रज्ञान, ऊर्जा आणि सुरक्षेच्या स्पर्धेत रेअर अर्थ मेटल्सची मागणी वेगाने वाढत असून, त्यांना “21st century चे ऑईल” म्हटले जाते.