कंपोझिट गॅस सिलेंडर म्हणजे काय रे भाऊ?

फायबर कंपोझिट सिलेंडर सध्या बाजारपेठांमध्ये खूप लोकप्रिय होत आहेत

कंपोझिट गॅस सिलेंडर हा पारंपरिक लोखंडी सिलेंडरपेक्षा फायबर ग्लास आणि HDPE मटेरियलपासून बनवलेला हलका सिलेंडर असतो.

हा साधारणपणे लोखंडी सिलेंडरपेक्षा जवळपास ५०% हलका असल्यामुळे उचलणे आणि वापरणे सोपे जाते

हा सिलेंडर अर्ध पारदर्शक असल्याने आत किती गॅस शिल्लक आहे हे बाहेरूनच दिसते, त्यामुळे सामान्य सिलेंडरपेक्षा हे वेगळे ठरते.

लोखंडी सिलेंडरसारखे या सिलेंडरला गंज लागत नाही, डाग पडत नाहीत आणि आधुनिक किचनसाठी हा सिलेंडर दिसायलाही आकर्षक दिसतो

सुरक्षेच्या दृष्टीने हा सिलेंडर जास्त सुरक्षित मानला जातो कारण उष्णतेत प्रेशर हळूहळू सोडला जातो, त्यामुळे फुटण्याचा धोका कमी असतो.

घरगुती वापरासोबतच हॉटेल, रिसॉर्ट, कॅम्पिंग आणि प्रवासासाठीही कंपोझिट सिलेंडर मोठ्या प्रमाणात वापरला जातो

वजनाला हलके, गंजमुक्त आणि पारदर्शक सिलेंडर असल्याने सुरक्षेच्या दृष्टीनेही हा उत्तम पर्याय आहे. ५ आणि १० किलो क्षमतेत तो उपलब्ध होतो

Click Here