तुम्ही दर महिन्याला SIP मध्ये पैसे टाकता, पण तुम्हाला अपेक्षित परतावा मिळत नाहीये? त्याचे कारण तुमच्या ५ मोठ्या चुका असू शकतात
शेअर बाजारातील घसरणीत SIP बंद करणे ही सर्वात मोठी चूक आहे! स्वस्त भावात जास्त युनिट्स खरेदी करण्याची संधी तुम्ही गमावता.
जेव्हा पोर्टफोलिओ निगेटिव्ह असतो, तेव्हाच तुमची खरेदी किंमत कमी होते. बाजार कोसळल्यावर SIP थांबवू नका, ती सुरू ठेवा.
थोडा नफा दिसला की लगेच पैसे काढू नका! SIP चे पहिले ३-५ वर्षे ही बीजे पेरण्यासारखी असतात. कंपाऊंडिंगला वेळ द्या.
वारंवार पोर्टफोलिओ तपासू नका. संयम आणि दीर्घकालीन गुंतवणूक हीच SIP ची खरी 'जादू' आहे. लवकर पैसे काढल्यास कंपाऊंडिंग ब्रेक होते.
एकाच म्युच्युअल फंड कंपनीच्या अनेक स्कीम्समध्ये गुंतवणूक करणे म्हणजे डायव्हर्सिफिकेशन नसते. तुमचे पोर्टफोलिओ एकाच पद्धतीचा होतो.
वेगवेगळ्या फंड हाऊसच्या विविध इन्व्हेस्टमेंट स्टाईलमध्ये गुंतवणूक करा. एकाच फंड हाऊसच्या जास्त स्कीम्स निवडणे टाळा.
दुसऱ्या फंडाचा जास्त परतावा पाहून लगेच फंड बदलल्यास एक्झिट लोड आणि कर लागतो. कंपाऊंडिंग पुन्हा तुटते.
महागाई दरवर्षी तुमचा खरा परतावा खात असते. तुमचे उत्पन्न वाढले तरी तुम्ही SIP ची रक्कम वाढवत नाही, ही गंभीर चूक आहे.
दरवर्षी ५-१०% ने SIP ची रक्कम वाढवा. शिस्त पाळा, फंड्स वारंवार बदलू नका आणि दीर्घकाळ टिकून राहा. हीच वेल्थ निर्मितीची गुरुकिल्ली आहे!