सायबर गुन्हेगार दिवसेंदिवस अधिक स्मार्ट होत चालले आहेत. जानेवारी ते मे २०२५ मध्ये सायबर गुन्हेगारांनी १,७५० कोटींहून अधिक रुपयांची चोरी केली.
परिणामी आता अधिक सावधान राहण्याची प्रत्येकाल गरज आहे. याचे काही प्रकार आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
बनावट पोलीस/सीबीआय अधिकारी बनून अटक करण्याची धमकी देतात. आता डीपफेक व्हिडिओही येतात.
कोणतेही सरकारी अधिकारी फोनवर पैसे किंवा OTP मागत नाहीत, हे लक्षात ठेवा.
फिशिंग! बँक किंवा Amazon सारख्या कंपन्यांचे नकली ईमेल/लिंक पाठवून क्रेडेन्शियल्स चोरले जातात.
अशा लिंकवर थेट क्लिक न करता, ईमेल पत्ता तपासा आणि 2FA (टू-स्टेप व्हेरिफिकेशन) नेहमी सुरू ठेवा.
WhatsApp ग्रुप्समधून उच्च परताव्याचे आमिष दाखवून पैसे लाटले जातात.
फक्त SEBI-नोंदणीकृत प्लॅटफॉर्मवरच संशोधन करून गुंतवणूक करा. कोणत्याही आमिषाला बळी पडू नका.
टेक सपोर्ट स्कॅम : डिव्हाईसमध्ये व्हायरस दाखवून रिमोट ॲक्सेस मागतात.
कोणत्याही अनोळखी व्यक्तीला तुमच्या कॉम्प्युटरचा रिमोट ॲक्सेस देऊ नका.
UPI/QR कोड फ्रॉड : पेमेंट करण्यापूर्वी रक्कम आणि क्यूआर कोड नेहमी तपासा.
कोणत्याही फसवणुकीची शंका आल्यास, तत्काळ १९३० किंवा cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा.