'या' देशात दुपारी दारू पिणं महाग पडेल; २६ हजार दंड भरावा लागेल

दरवर्षी बरेच भारतीय पर्यटक हजारोंच्या संख्येने हा देश फिरायला जातात.

जर तुम्ही थायलंडला जाण्याचा प्लॅन करताय आणि तुम्ही दारू पित असाल तर तिथे बदललेला नियम जाणून घेणे आवश्यक आहे

८ नोव्हेंबरपासून लागू झालेल्या या नियमानुसार, निर्बंध असलेल्या ठिकाणी आणि वेळेत जर तुम्ही दारू प्याल तर १०,००० Baht म्हणजेच २६ हजार भरावे लागतील

बिझनेस टुडेनं ब्लूमबर्गच्या रिपोर्टचा हवाला देत १९७२ मध्ये लागू केलेल्या या कायद्यातील सर्वात कठोर कारवाईच्या तरतूद सांगितली आहे

थायलंडमध्ये दारू विक्री सामान्य आहे, बहुतांश रिटेल शॉप आणि सुपरमार्केटमध्ये दुपारी २ ते संध्याकाळी ५ पर्यंत विक्रीवर बंदी आहे

परंतु कायद्यानुसार परवाना प्राप्त मनोरंजन स्थळे, हॉटेल आणि एअरपोर्ट लाऊंजमध्ये या नियमातून सूट देण्यात आली आहे. 

नव्या नियमानुसार निर्बंध असलेल्या ठिकाणी आणि वेळात दारू विक्री करणे आता महागात पडू शकते, त्याचा थेट परिणाम ग्राहकांवर होईल

या बदलामुळे रेस्टॉरंट मालिक चिंतेत आहेत. त्यामुळे त्यांच्या व्यवसायाला नुकसान होऊ शकते. कारण दंड थेट ग्राहकांवर लागणार आहे.

Click Here