शेअर बाजारात नवख्या व्यक्तीने कशी गुंतवणूक करावी?

अनेकांना शेअर बाजारात गुंतवणूक करायची असते. पण, सुरुवात कशी करावी याची माहिती नसते.

पण, चिंता करू नका. आम्ही नवख्या व्यक्तींसाठी काही टीप्स घेऊन आलो आहोत.

नवख्या व्यक्तींसाठी म्युच्युअल फंड हा सर्वात सुरक्षित पर्याय मानला जातो. कारण, हे तज्ज्ञांनी मॅनेज केलेले फंड असतात.

यामुळे जोखीम कमी होते आणि तुमचा पैसा अनेक चांगल्या कंपन्यांमध्ये विभागला जातो.

ब्लू-चिप स्टॉक्स हे मोठ्या आणि स्थिर कंपन्यांचे शेअर्स असतात. इथे परतावा कमी असला तरी पैसे बुडण्याची शक्यता कमी होते.

उदा. रिलायन्स, टीसीएस, इन्फोसिस. यात परतावा स्थिर असतो.

छोट्या आणि अज्ञात कंपन्यांपासून दूर राहा. त्यात जोखीम खूप जास्त असते.

गुंतवणूक करत असताना टप्प्याटप्प्याने करा. म्हणजे कमी रक्कम आणि दीर्घकाळ गुंतवणूक.

कोणत्याही योजनेत किंवा शेअरमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी त्याची सविस्तर माहिती घ्या.

Click Here