पेट्रोल पंप उघडून मोठी कमाई करा! 

पेट्रोल पंप उघडण्यासाठी किती खर्च येतो? जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस...

तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर पेट्रोल पंपाचा व्यवसाय तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो. यात तोटा होण्याची शक्यता खूपच कमी आहे. 

पेट्रोल पंप उघडणे सोपे नाही, परंतु एकदा सुरू केल्यानंतर त्यातून चांगले उत्पन्न मिळू शकते. सुरुवातीला या व्यवसायात मोठी गुंतवणूक करावी लागते.

ग्रामीण भागात पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी किमान ₹ 20 लाखांची गुंतवणूक आवश्यक आहे. तर, शहरी भागात ही गुंतवणूक ₹ 50 लाखांपर्यंत जाऊ शकते.

खर्चात परवाना शुल्क, भूमिगत टाक्या, इंधन डिस्पेंसर आणि इतर पायाभूत सुविधांचा खर्च समाविष्ट आहे. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी बँकेकडून ₹ 2 कोटी पर्यंतचे कर्जदेखील मिळते.

पेट्रोल पंप उघडण्यासाठी जमीन असणे खूप महत्वाचे आहे. शहरी भागात ८०० ते १२०० चौरस मीटर, तर ग्रामीण भागात १२०० ते १६०० चौरस मीटर असावी.

जमीन मुख्य रस्त्यावर किंवा महामार्गावर असणे देखील महत्वाचे आहे, जेणेकरून वाहनांची सतत हालचाल होत राहील. 

तुमच्याकडे स्वतःची जमीन नसेल, तर तुम्ही भाड्याने घेतलेल्या जमिनीवर देखील पेट्रोल पंप उघडू शकता. तुमच्याकडे १५ ते २५ वर्षांचा वैध भाडेपट्टा करार असावा.

पेट्रोल पंप उघडण्यासाठी IOCL (इंडियन ऑइल), BPCL (भारत पेट्रोलियम), HPCL (हिंदुस्थान पेट्रोलियम). या कंपन्या वेळोवेळी डीलरशिपसाठी अर्ज मागवतात. 

निवड झाल्यानंतर तुम्हाला स्थानिक प्रशासनाकडून NOC, अग्निसुरक्षा प्रमाणपत्र आणि महानगरपालिकेकडून आवश्यक परवानगी घ्यावी लागेल. 

पेट्रोल पंप व्यवसाय जितका सोपा दिसतो तितकाच त्यात कठोर परिश्रम आणि जबाबदारी असते. हा दीर्घकाळात फायदेशीर व्यवसाय बनू शकतो.

Click Here