देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हटलं की आपसूक ओठांवर उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांचं नाव येतं.
पण, यावर्षी एका महिलेने इतिहास घडवला आहे.
रोशनी नाडर मल्होत्रा पहिल्यांदाच टॉप-३ श्रीमंत भारतीयांच्या यादीत आल्या आहेत!
त्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची एकूण संपत्ती २.८४ लाख कोटी रुपये इतकी आहे!
रोशनी या HCL टेक्नॉलॉजीजच्या अध्यक्षा आहेत.
त्यांना ही संपत्ती त्यांचे वडील, एचसीएलचे संस्थापक शिव नाडर यांच्याकडून ४७% हिस्सा मिळाल्याने वाढली.
त्या शिव नाडर फाउंडेशनद्वारे शिक्षण आणि 'द हॅबिटॅट्स ट्रस्ट'द्वारे वन्यजीव संरक्षणाचे काम करतात.
२०२५ च्या यादीत एकूण १०१ महिला अब्जाधीश आहेत, जे महिलांच्या वाढत्या प्रभावाचे प्रतीक आहे.
विशेष म्हणजे, बहुतेक अब्जाधीश (७४%) स्व-निर्मित आहेत, जे आपल्या मेहनतीने पुढे आले आहेत.
यावर्षी शाहरुख खान देखील प्रथमच अब्जाधीश क्लबमध्ये सामील झाले आहेत!