पोस्ट ऑफिसची दमदार स्कीम!
सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय- Public Provident Fund (PPF) ही सरकार समर्थित सुरक्षित योजना आहे.
स्थिर व्याजदर- सध्या PPF वर सुमारे ७.१% वार्षिक व्याज मिळते.
पूर्णपणे टॅक्स फ्री- या योजनेतील व्याज आणि मॅच्युरिटीची रक्कम दोन्ही करमुक्त असतात.
दीर्घकालीन गुंतवणूक- या योजनेचा कालावधी १५ वर्षांचा असून पुढे वाढवता येतो.
दरवर्षी गुंतवणूक मर्यादा- किमान ₹५०० ते कमाल ₹१.५ लाख दरवर्षी गुंतवणूक करता येते.
१५ वर्षांत मोठा फंड- दरवर्षी ₹१.५ लाख गुंतवल्यास एकूण गुंतवणूक ₹२२.५ लाख होते.
मॅच्युरिटीवर मोठी रक्कम- १५ वर्षांनंतर एकूण रक्कम सुमारे ₹४०.६८ लाख होऊ शकते.
फक्त व्याजातून कमाई- यामध्ये सुमारे ₹१८.१८ लाख फक्त व्याजातून मिळू शकतात.
कमी पैशांत सुरुवात- फक्त ₹५०० पासूनही गुंतवणूक सुरू करता येते. ही योजना सर्वांसाठी खुली आहे.