सरकारने लोकांना मोठा दिलासा देत जीएसटी दरांमध्ये मोठी कपात केली आहे.
अनेक गरजेच्या आणि रोजच्या वापरातील वस्तू आता स्वस्त होणार आहेत.
हे नवे दर २२ सप्टेंबरपासून देशभरात लागू होतील.
दूध आणि पनीर यांसारख्या वस्तूंवरचा १२% जीएसटी आता शून्य करण्यात आला आहे.
तेल, शॅम्पू आणि साबण १८% वरून ५% जीएसटी स्लॅबमध्ये आले आहेत.
बिस्किट, नमकीन आणि मिठाईसारख्या वस्तूंवरचा टॅक्स आता १८% वरून फक्त ५% असेल.
पिझ्झा ब्रेड आणि सर्व प्रकारच्या ब्रेडवरचा ५% जीएसटी आता पूर्णपणे रद्द झाला आहे.
२,५०० रुपयांपर्यंतचे कपडे आणि बूट देखील आता स्वस्त होणार आहेत.
एसी, टीव्ही यांसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरील जीएसटी २८% वरून १८% पर्यंत कमी करण्यात आला आहे.
पेन्सिल, रबर, कटरसारख्या मुलांच्या शैक्षणिक वस्तूही आता जीएसटी-मुक्त झाल्या आहेत.