LIC ने लॉन्च केल्या दोन रिस्क-फ्री योजना

दिवाळीपूर्वी LIC कडून मध्यमवर्गासाठी दोन योजनांची भेट!

भारतीय जीवन विमा निगमने (LIC) मध्यमवर्गीय आणि सामान्य लोकांसाठी दोन नवीन रिस्क-फ्री विमा योजना सुरू केल्या आहेत.

या दोन्ही योजना १५ ऑक्टोबरपासून सर्वांसाठी उपलब्ध होतील, अशी माहिती LICने एक्स्चेंज फायलिंगद्वारे दिली आहे.

दोन्ही योजना नॉन-लिंक्ड आणि नॉन-पार्टिसिपेटिंग, म्हणजेच शेअर बाजाराच्या जोखमीपासून पूर्णपणे मुक्त आहेत. या योजनांमध्ये स्थिर आणि खात्रीशीर परतावा मिळेल.

LIC जन सुरक्षा योजना- ही योजना लो-इनकम गटासाठी कमी प्रीमियमवर तयार केली गेली आहे. मायक्रोइन्शुरन्स योजना म्हणून, ती आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गासाठी योग्य आहे.

LIC बीमा लक्ष्मी योजना- ही योजना जीवन विमा + सेव्हिंग्स (बचत) या दोन्ही सुविधा एकत्र देते. जीवन सुरक्षा आणि परिपक्वतेच्या वेळी बचत रक्कमेचा लाभ मिळतो.

शेअर बाजारातील चढ-उतारांचा या योजनांवर काहीही परिणाम होत नाही. दोन्ही योजनांमध्ये कमी प्रीमियम आणि सुरक्षिततेवर भर देण्यात आला आहे.

Click Here