भारतातून किती चहाची निर्यात होते?
करोडो लोकांसाठी चहा म्हणजे प्रेम. सकाळी चहाशिवाय त्यांच्या दिवसाची सुरूवातच होत नाही. जगभरातही चहाप्रेमी कमी नाहीत.
त्यात भारतीय चहाच्या प्रेमात असलेल्यांची संख्याही मोठी आहे. आयबेफच्या माहितीनुसार, भारतातून अशा देशात मोठ्या प्रमाणात चहाची निर्यात केली जाते.
आयबेफ म्हणजे इंडिया ब्रॅण्ड इक्विटी फाऊंडेशन. भारत सरकारची ही संस्था भारतीय उत्पादक ब्रॅण्डचा परदेशात प्रचार, प्रसार करते.
तर आयबेफच्या माहितीनुसार, गेल्या वर्षी म्हणजे २०२४ मध्ये भारताने २५० मिलियन किलो चहाची निर्णयात केली. म्हणजेच ७७६ मिलियन डॉलर.
भारतातून सर्वाधिक चहाची निर्यात केली गेली ती यूएईमध्ये. एप्रिल २०२४ ते डिसेंबर २०२४ या काळात यूएईमध्ये १२३.३ मिलियन डॉलर चहाची निर्यात केली गेली.
त्यानंतर अमेरिकेत ७०.९ मिलियन चहाची निर्यात केली गेली. सर्वाधिक चहा निर्यात केल्या गेलेल्या देशामध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे, इराक (६१.२ मिलियन).
चौथ्या क्रमांकावर युके (५१.४ मिलियन डॉलर) असून, पाचव्या क्रमांकावर रशिया (५१.३ मिलियन डॉलर) आहे.