क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक कशी करायची?

भारतात क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करणे कायदेशीर आहे, पण ते अधिकृत चलन नाही. फक्त डिजिटल मालमत्ता म्हणून खरेदी-विक्री करू शकता.

CoinDCX, WazirX यांसारखे भारतीय किंवा Binance, Kraken सारखे आंतरराष्ट्रीय एक्सचेंज निवडू शकता. पण, खात्री करुनच निर्णय घ्या.

आवश्यक कागदपत्रे कोणती?

केवायसीसाठी आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँक तपशील लागतील. एकदा पडताळणी झाली की, तुम्ही तुमच्या वॉलेटमध्ये पैसे जोडू शकता.

पैसे कसे जमा कराल?

तुम्ही बँक खाते किंवा UPI द्वारे तुमच्या क्रिप्टो वॉलेटमध्ये पैसे जमा करू शकता. ही प्रक्रिया सोपी आणि जलद असते.

ऑर्डर कशी द्याल?

एक्सचेंजच्या ॲप/वेबसाइटवर जाऊन मार्केट ऑर्डर (सध्याच्या किमतीवर) किंवा लिमिट ऑर्डर (ठराविक किमतीवर) देऊ शकता.

गुंतवणुकीपूर्वी संशोधन महत्त्वाचे!

कोणत्याही नाण्यात गुंतवणूक करण्यापूर्वी त्या नाण्याच्या तंत्रज्ञानाबद्दल, टीमबद्दल आणि बाजारातील ट्रेंडबद्दल अभ्यास करा.

क्रिप्टो कुठे साठवाल?

तुमचे क्रिप्टो डिजिटल वॉलेटमध्ये (हॉट वॉलेट किंवा कोल्ड वॉलेट) साठवा. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी कोल्ड वॉलेट सुरक्षित मानले जाते.

क्रिप्टोवर किती कर आहे?

भारतात, क्रिप्टोमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर ३०% कर लागतो आणि प्रत्येक मोठ्या व्यवहारावर १% टीडीएस (TDS) कापला जातो.

आयटीआरमध्ये दाखवणे महत्त्वाचे!

तुमचे क्रिप्टो उत्पन्न आयटीआरमध्ये योग्यरित्या दाखवणे बंधनकारक आहे, अन्यथा अडचणी येऊ शकतात.

गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा!

क्रिप्टोच्या किमती वेगाने बदलतात, त्यामुळे जितके पैसे गमवायची तयारी असेल, तितकीच गुंतवणूक करा. तज्ज्ञांचा सल्ल्याशिवाय गुंतवणूक करू नये.

Click Here