पगारातून बचत कशी वाढवावी?

चांगला पगार असूनही महिन्याच्या शेवटी अनेकांच्या हातात काहीच उरत नाही, अशी अवस्था होते.

तुमच्यासोबतही असेच घडत असेल तर आजपासूनच या सोप्या नियमांचे पालन करा.

पगार मिळताच, सर्वात आधी बचत काढून ठेवा.

बचतीचे एक निश्चित उद्दिष्ट ठरवा. उदा. अमुक एक रक्कम निश्चित करा.

बचतीसाठी तुम्ही ऑटो-डेबिट सुविधा वापरू शकता. म्हणजे पगार आला की लगेच बचत बाजूला काढली जाईल.

खर्चांचा हिशोब ठेवा. यामुळे कुठे अनावश्यक खर्च होतो हे कळेल.

हिशोबात जे खर्च अनावश्यक झालेत, ते यापुढे टाळण्याचा प्रयत्न करा.

५०/३०/२० या नियमाचे पालन करा. (५०% गरजा, ३०% इच्छा, २०% बचत).

लक्षात ठेवा, छोटी बचतही भविष्यात मोठी मदत करते.

आजपासूनच सुरुवात करा आणि तुमचे आर्थिक भविष्य सुरक्षित करा!

Click Here