औषधी ऑनलाइन मागवताना 8 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा

अॅप किंवा वेबसाईटवरून औषधी मागवताना कोणत्या चुका टाळाल?

हल्ली प्रत्येक गोष्ट घरपोच मिळू लागली आहे. जेवणापासून ते औषधीपर्यंत. पण, औषधी मागवताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. 

औषधी ऑर्डर करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरचा सल्ला घ्या. ऑनलाइन माहितीच्या आधारे औषधी घेणे जीवघेणेही ठरू शकते.

नेहमी विश्वसनीय फॉर्मसी वेबसाईटवरूनच औषधी मागवा. स्थानिक किंवा माहिती नसलेल्या ठिकाणावरून औषधी मागवू नका. तिथून कालबाह्य औषधी मिळू शकतात.

औषधी व्यवस्थित पॅक केलेली नसेल, तर ती असुरक्षित असू शकते. त्यामुळे डिलिव्हरी स्विकारतानाच औषधी व्यवस्थित तपासून घ्या.

औषधी घेतल्यानंतर त्यावर कंपनीचे नाव, औषधीचे नाव, बॅच नंबर, एक्सपायरी डेट ही माहिती व्यवस्थित बघा. ती नसेल, तर औषधी बोगस असू शकते.

काचेच्या बॉटलमध्ये येणारी औषधी बबल रॅप नसलेली किंवा सील तोडलेली असेल, तर ती घातक ठरू शकते. ती व्यवस्थित तपासून घ्या.

औषधी घेतल्यानंतर जर रिअॅक्शन झाली किंवा इतर साईड झाल्यास लगेच ड्रग्ज कंट्रोल अथॉरिटी किंवा आरोग्य विभागाकडे तक्रार करा.

डिलिव्हरी एजंटसमोरच औषधी बॉक्स उघडून त्या व्यवस्थित तपासून घ्या आणि चुकीची औषधी पाठवलेली असले, तर लगेच परत करा.

स्मार्टफोन ऐकतोय तुमचं खासगी बोलणं? प्रायव्हसी धोक्यात

Click Here